लग्न होणार, पण सोबत राहणार नाही बायको? शाहीन आफ्रिदीच्या लग्नापूर्वी समोर आली मोठी बातमी


आज 3 फेब्रुवारी हा पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. लाला या नावाने ओळखला जाणारा दिग्गज पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. शाहीन शुक्रवारी शाहिदची मुलगी अंशाशी लग्न करणार आहे.

दोन वर्षांपूर्वी शाहिद आफ्रिदीने त्याची मुलगी आणि शाहीन आफ्रिदीच्या एंगेजमेंटची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, मुलीच्या शिक्षणामुळे शाहिदने लग्नासाठी दोन वर्षे वाट पाहिली. आता शाहीनची ही प्रतीक्षा संपणार आहे.

शाहीन आणि अंशाचा विवाह आज रात्री (3 फेब्रुवारी) कराचीमध्ये होणार आहे. शाहीनला लग्नानंतरही पत्नीपासून दूर राहावे लागणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की शाहीन आणि अंशा निकाहनामावर सही करतील, परंतु शाहिद अद्याप मुलीची रुक्सती (विदाई) करणार नाही. रुक्सतीशिवाय शाहीन अंशासोबत राहू शकणार नाही.

शाहीनने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, अंशाशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे, याचा त्याला खूप आनंद आहे. एंगेजमेंट झाल्यापासून तो या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या लग्नाचा हंगाम आला आहे. शाहीनपूर्वी वेगवान गोलंदाज हारिस रौफ, फलंदाज शान मसूद आणि अष्टपैलू खेळाडू शाबाद खान यांनीही लग्न केले आहे.

The post लग्न होणार, पण सोबत राहणार नाही बायको? शाहीन आफ्रिदीच्या लग्नापूर्वी समोर आली मोठी बातमी appeared first on Majha Paper.



source https://www.majhapaper.com/2023/02/03/will-get-married-but-will-not-be-with-the-wife-big-news-came-out-before-shaheen-afridis-marriage/

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !