शिरसदेवी परिसरामध्ये पावसाने पिकांचे नुकसान नुकसानभरपाई देण्याची मागणी
Author -
admin
October 09, 2022
शिरसदेवी : शिरसदेवी परिसरात संततधार पावसाने सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कापसाचे पीक पिवळे पडले आहे.
शिरसदेवी परिसरात पावसाने झालेले पिकांचे नुकसान.
सोयाबीन काढून शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेले आहे. शिरसदेवी परिसरातील भेंडटाकळी, काजळवाडी, भेंड खुर्द, लोणाळा, चिंचोली, सुलतानपूर, भेंड बुद्रुक, रूई, अर्धा मसला, रानमळा, भाटेपुरी, मारफळा, नंदपूर, मालेगाव, नांदलगाव या परिसरामध्ये संततधार पाऊस झाला आहे. या पावसाने सोयाबीन, उडीद पीक भिजले आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.